हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयावर विशेष परिसंवाद*_ *धर्मशास्त्रांत सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करा ! - श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था*
सध्या कोरोनामुळे बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. अशा वेळी धर्माचा अभ्यास न करता प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि तथाकथि...
